उगारगोळ : हिरेकुंबीजवळ शुक्रवारी सायंकाळी दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. बसवराज प्रभुनावर (वय 48, रा. सौंदत्ती), यल्लाप्पा कोरविनकोप्प (46, रा. हंचिनाळ) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
या अपघातात जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रामदुर्गचे डीवायएसपी पांडुरंगय्या आणि सौंदत्तीचे सीपीआय डी. एस. धर्मट्टी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या अपघाताची नोंद सौंदत्ती पोलिस ठाण्यात झाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta