Tuesday , March 3 2026
Breaking News

श्री चांगळेश्वरी युवक मंडळातर्फे आदित्य आनंद पाटील याचा सत्कार

Spread the love

 

बेळगाव : येळ्ळूर येथील कु. आदित्य आनंद पाटील याने 2024 मध्ये झालेल्या सिव्हिल इंजिनिअरिंग परीक्षेत 95% गुण मिळवून जैन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रथम तसेच, विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठातून कर्नाटक राज्यात सुवर्णपदकासह चौथा क्रमांक पटकावल्याबद्दल चांगळेश्वरी युवक मंडळ यांच्यातर्फे 21-07-2024 रोजी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील, उद्योजक एन. डी. पाटील, श्रीकांत आप्पाजी पाटील, अनंत अप्पाजी पाटील, गल्लीतील नामवंत इंजिनिअर मनोहर सिद्धाप्पा पाटील, पत्रकार गंगाधर शंकर पाटील, शंकर रघुनाथ पाटील, अनिल पुंडलिक पाटील, पांडुरंग यशवंत पाटील, चंद्रकांत बाबुराव पाटील, उत्तम माऱ्याप्पा पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते कु. आदित्य पाटील याचा पुष्पहार, शाल आणि मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील यांनी आपले विचार व्यक्त करत आदित्यच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच उपस्थित मान्यवरांनी देखिल आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी आदित्यने आपल्या शालेय शिक्षणापासून ते या यशापर्यंतच्या प्रवासाविषयी सांगत आपल्या शिक्षकांमुळेच आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपण हे यश संपादन करू शकलो असे तो म्हणाला.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नारायण सोमान्ना पाटील सर यांनी केले.
कार्यक्रमाला सतीश बाळकृष्ण पाटील, उद्योजक एन. डी. पाटील, श्रीकांत आप्पाजी पाटील, अनंत आप्पाजी पाटील,गल्लीतील नामवंत इंजिनिअर मनोहर सिद्धाप्पा पाटील, पत्रकार गंगाधर शंकर पाटील तसेच पांडुरंग यशवंत पाटील, अनिल पु. पाटील, शंकर र. पाटील, उत्तम माऱ्याप्पा पाटील, चंद्रकांत बाबुराव पाटील, सतीश गणपती पाटील तसेच श्री चांगळेश्वरी युवा मंडळाचे कार्यकर्ते संदीप बा. पाटील, अमोल अ. पाटील, अजय अ. पाटील, हेमंत प्र. पाटील, अक्षय मा. हट्टीकर, समर्थ न. पाटील, अमेय प्र. हट्टीकर, सुशांत सु. पाटील, साहिल श. पाटील, प्रज्वल अ. पाटील, जय ग. पाटील आणि इतर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *