बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. हुक्केरी तालुक्यातील हिरण्यकेशी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने बेळगाव-कोल्हापूर महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर जादा पाणी आल्याने वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे.
सततच्या पावसामुळे बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील हेब्बाळजवळ हिरण्यकेशी नदीच्या पाण्याची पातळी वाढत आहे. जास्तीचे पाणी शेतात आणि तेथून राष्ट्रीय महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर जात आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत असून, पोलिसांच्या नेतृत्वाखाली महामार्गावरील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नाने सध्या सर्व्हिस रोडवर पाणी अडवले जात आहे. त्यामुळे बेळगाव कोल्हापूर प्रवासास अडथळा निर्माण होऊन विलंब होत आहे.