बेळगाव : श्रीमती लक्ष्मीबाई जयवंत कोंडुसकर प्रतिष्ठान, महाराष्ट्र एकीकरण समिती आणि श्रीराम सेना हिंदुस्थानतर्फे कंग्राळी खुर्द येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी मॉडेल शाळेत मंगळवार दिनांक ३० जुलै २०२४ रोजी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना दप्तर (बॅग) वितरण करत आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या एसडीएमसी सदस्या सौ. पौर्णिमा मोहिते होत्या.
प्रमुख पाहुणे म्हणून म. ए. समितीचे चंद्रकांत कोंडुसकर, माजी जि. पं. सदस्या सौ. सरस्वती पाटील, विद्यमान सदस्य आणि माजी उपाध्यक्ष श्री. केंपाना सनदी, कुमार प्रशांत पाटील, श्री. वैजु बेनाळकर, श्री. राकेश पाटील, ग्राम पंचायत सदस्य कुमार विनायक कम्मार, श्री. रणजीत पाटील, श्री. परशराम पाटील, सौ. मीनाक्षी मुतगेकर, सौ. ज्योती पाटील, एसडीएमसी सदस्या सौ. पूनम पाटील आणि योगा शिक्षिका सौ. मनीषा मुर्डेकर तसेच म. ए. समितीचे श्री. संजय चौगुले, श्री. किरण हुद्दार यांच्या उपस्थितीत बॅग वितरण पार पडला.
मान्यवरांचे मुलांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. शाळा वरिष्ठ मुख्याध्यापक यांनी सूत्रसंचालन केले. शेवटी अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली.