बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे मराठा समाजातील यंदाच्या दहावी व बारावी परीक्षेत 90 टक्के गुण घेतलेल्या 122 गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा रविवार दि. 4 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे.
रेल्वे ओव्हर ब्रिजजवळील मराठा मंदिर येथे सकाळी 10.30 वा. होणाऱ्या या सोहळ्यास प्रमुख पाहुणे या नात्याने शिवाजी विद्यापीठाचे डॉ. उदय पाटील व डॉ. नवनाथ वालेकर व देणगीदार उद्योजक विजय कंग्राळकर, शीतल वेसणे व शिक्षणप्रेमी दीपक किल्लेकर उपस्थित राहणार आहेत. यावेळी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (युपीएससी) धवल यश मिळविलेल्या राहुल पाटील तसेच चार्टर्ड अकाऊंट (सी. ए.) परीक्षेत यश मिळविणारे शिवम मंडोळकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी यशवंत विद्यार्थ्यांनी पालकांसह तसेच समाज बांधवांनी वेळेवर उपस्थित रहावे व अधिक माहितीसाठी कार्याध्यक्ष शिवराज पाटील (9845960531) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta