बेळगाव : अलतगा गावातून दुचाकीवरून शेजारील कंग्राळी गावात कटिंग करण्यासाठी गेलेले दोन तरुण अलतगाजवळ कालव्यात पुराच्या पाण्यातून वाहून गेल्याची घटना आज सायंकाळी घडली असून एक बचावला आहे तर दुसरा तरुण बेपत्ता झाल्याचे समजते.
अलतगा गावातील ओंकार पाटील व ज्योतिनाथ पाटील नावाचे दोन तरुण कंग्राळी येथून त्यांच्या मूळ गावी अलतगा गावाकडे दुचाकीवरून परतत असताना दुचाकी नदीत वाहून गेली. ओंकार पाटील नावाचा तरुण बेपत्ता झाला असून ज्योतिनाथ पाटील बचावला आहे.
काकती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून बेपत्ता तरुणाचा शोध सुरू आहे.
Belgaum Varta Belgaum Varta