Friday , November 6 2026
Breaking News

येत्या ७२ तासांत मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा इशारा

Spread the love

 

बंगळुरू : यंदा पावसाने भीषण पूरस्थिती निर्माण केली असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी हवामान खात्याने पुढील ७२ तास ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

पावसाळा संपायला अजून २ महिने बाकी आहेत. म्हणजेच सप्टेंबर २०२४ पर्यंत मान्सून पाऊस पडेल. असे असले तरी अवघ्या २ महिन्यात पावसाच्या राया वर्षभरात एवढा पाऊस पडला आहे. पुढील ७२ तास पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुसळधार पावसाच्या शक्यतेने किनारपट्टी आणि डोंगराळ भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून लोकांची दमछाक झाली आहे. मात्र आता उत्तर कर्नाटकातही मान्सूनचा पाऊस पडणार हे निश्चित आहे. बिदर, कलबुर्गी, रायचूर, बागलकोटसह कोप्पळ, बेल्लारी, बेळगाव, गदग या भागांसह हुबळी आणि धारवाड भागांमध्ये मान्सूनचा पाऊस मोठ्या प्रमाणावर पडत असल्याचे सांगण्यात आले.

पुढील तीन दिवस कर्नाटकातील डोंगराळ आणि किनारपट्टी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा देण्यात आला आहे. कर्नाटकातील दक्षिण कन्नड, उत्तर कन्नड, उडुपी या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये पुन्हा पाऊस होण्याची खात्री आहे. याशिवाय डोंगराळ भागात पाऊस सुरूच राहणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

बस तिकीट दरवाढीच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी; अंतिम निर्णय परिवहन विभागाकडे

Spread the love  बेळगाव : महागाईचा आलेख दिवसेंदिवस उंचावत असल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडत चालले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *