बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील अथणी शहरातील जत रोडवर असलेल्या एका ऑटोमोबाईल दुकानाला काल रात्री उशिरा भीषण आग लागून मोठ्या प्रमाणात माल जळून खाक झाला.
अथणी शहरातील रहिवासी बसवराज यांच्या ऑटोमोबाईल दुकानातील लाखो रुपयांची वाहने, वाहनांचे सुटे भाग व सर्व साहित्य जळून खाक झाले. आगीची माहिती मिळताच अथणी अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवली या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Belgaum Varta Belgaum Varta