Wednesday , March 4 2026
Breaking News

तालुका समिती अध्यक्ष कै. निंगोजीराव हुद्दार यांची उद्या शोकसभा

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष कै. निंगोजीराव हुद्दार यांची शोकसभा गुरुवार दिनांक ८ रोजी दुपारी २.०० वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओव्हर ब्रिज) येथे होणार आहे.
तरी या शोकसभेला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, सदस्यांनी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, आजी-माजी लोकप्रतिनिधींनी, सीमा भागातील समस्त मराठी भाषिकांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर व चिटणीस ऍड. एम. जी. पाटील, बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे उपाध्यक्ष ऍड. राजाभाऊ पाटील, युवा नेते आर. एम. चौगुले, माजी तालुका पंचायत सदस्य रावजी पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य रामचंद्र मोदगेकर, आर. के. पाटील यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *