बेळगाव : बेळगाव तालुक्यातील नावगे गावाजवळ असलेल्या स्नेहम इंटरनॅशनल या कंपनीला आग लागून मृत्युमुखी पडलेला तरुण कामगार यल्लाप्पा सन्नगौडा गुंड्यापगोळ याचा मृतदेहाची उत्तरीय तपासणी केल्यानंतर त्याच्या अस्थी त्याच्या कुटुंबीयांकडे सोपविण्यात आल्या आहेत.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या उपस्थितीत, बचाव कार्य करणाऱ्या पथकाने मृत कामगार यल्लाप्पा गुंड्यापगोळ याच्या अस्थी त्याच्या कुटुंबीयांकडे सोपविल्या. आपल्या मुलाच्या अस्थी हातात घेऊन यल्लाप्पाच्या वडिलांनी केलेला आक्रोश मन हेलावणारा होता. मातीच्या मडक्यातून जरी अस्थी दिल्या गेल्या तरी पाऊस असल्याने ते मडके प्लॅस्टिकमध्ये ठेवले अशी प्रतिक्रिया मृत यल्लाप्पाच्या वडिलांनी दिली. सकाळी ६ च्या सुमारास यल्लाप्पाचे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले. हि घटना घडली त्यावेळी यल्लाप्पा लिफ्टजवळ असल्याची माहिती त्याच्या सहकाऱ्यांनी दिली होती. त्यानुसार बचाव पथकाने तपास घेतला आणि १० वाजता अखेर लिफ्टमधील यल्लप्पाच्या मृतदेहाचे अवशेष सापडले. यानंतर आरोग्य विभागासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाहणी करण्यात आली. पोलीस उपायुक्तांसह वरिष्ठांच्या उपस्थितीत अस्थी यल्लाप्पाच्या कुटुंबीयांकडे सोपविण्यात आल्या.
Belgaum Varta Belgaum Varta