
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील नावगे गावाजवळ असलेल्या स्नेहम टेपिंग सोल्युशन्स प्रा. कारखान्याला नुकत्याच लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगाराच्या कुटुंबीयांना कारखाना १८ लाख रुपयांची भरपाई देणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
आगीत मृत्युमुखी पडलेल्या यल्लाप्पा गौंड्यागोळ याच्या वडिलांच्या आणि आईच्या नावे कारखान्याने प्रत्येकी नऊ लाख रुपयांचा धनादेश जारी केला आहे.
मयत मजुराच्या कुटुंबीयांना उद्या धनादेश देण्यात येणार असल्याचे कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta