बेळगाव : बेळगावमध्ये घडत असलेल्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर माळमारुती पोलीस स्थानकाच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका आंतरराज्य चोराला अटक करण्यात आली आहे. नागराज सुभाष कचेरी कमलापूर (रा. गुलबर्गा) उर्फ नवीन गरकुल कुंभारी (रा. सोलापूर याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने केलेल्या चोरीच्या घटना उघड झाल्या आहेत. त्याने त्याच्या मित्रांसह एक्सयूव्ही 500 लक्झरी कारवर प्रेस असे लिहिले होते. यावरून त्याची चौकशी केली असता सर्व प्रकार उघड झाला आहे. अटक केलेल्या आरोपीने महांतेश नगर, अंजनेय नगर व शिवबसव नगर येथे चोरी केल्याची कबुली दिली असून त्याच्याकडून १० लाखांचे सोने व एक एक्सयूव्ही कार असा सुमारे १० लाखांचा मुद्देमाल जप्त करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. त्याच्यासह त्याचे साथीदार देखील चोरीच्या घटनांमध्ये सहभागी होते. मात्र सध्या ते फरार असून त्यातील हुसेन उर्फ सागर गायकवाड, अमूल आणि केत्या अशा तिघांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हि कारवाई करण्यात आली आहे. मार्केट पोलीस स्थानकाचे एसीपी सोमगौडा यु यांच्या मार्गदर्शनाखाली कालीमिर्ची यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय होन्नाप्पा तळवार, पीएसआय श्रीशैल हुळगेरी, कर्मचारी एम. जी. कुबेर, चिन्नाप्पागोळ, बसू बस्त, चंद्रू चिगरी, के. बी. गौरानी, होसमनी, रवी बारीकर, मुजावर, शिवाजी चौहान, मारुती मादर, मल्लिकार्जुन गाडवी, जगन्नाथ भोसले, बसवराज कल्लाप्पाणावर, महादेव काशीद या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला होता. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने केलेल्या या कारवाईचे पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबानीयांग यांनी कौतूक केले आहे.