बेळगाव : सौंदत्ती येथील यल्लम्मा डोंगरातील एका हॉटेलमध्ये कुकरचा स्फोट होऊन १० हून अधिक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमींना सौंदत्ती तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर गंभीर जखमी झालेल्या तिघांना हुबळी किम्स रुग्णालयात हलवण्यात आले आहे, सौंदत्ती येथे देवाच्या दर्शनासाठी आलेले भाविक सौंदत्ती यल्लम्मा डोंगरातील हॉटेलमध्ये थांबले होते. यावेळी पोळ्या बनवण्यासाठी त्यांनी हॉटेलच्या खोलीत कुकरमध्ये शिजवण्यासाठी डाळ ठेवली होती. मात्र ते कुकरमध्ये पाणी घालायला विसरल्याचे बोलले जात आहे. काही वेळाने कुकरचा स्फोट होऊन आग लागली. आगीच्या तीव्रतेमुळे हॉटेल पूर्णपणे जळून खाक झाले. या घटनेत १० हून अधिक जण जखमी झाले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta