बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कोंडुसकोप्पजवळील यरमाळ गावात वाघ आणि बिबट्या गावात आल्याचा व्हिडीओ एडिट करून अफवा पसरवणाऱ्या दोघांना माहिती वन अधिकाऱ्यांनी अटक केली.
बेळगाव शहरात बिबट्या, हत्ती आणि जंगली प्राणी वारंवार दिसू लागले असून त्याचा लोकांना त्रास होत आहे. वाघ शेतात पळत असल्याचा व्हिडीओ एडिट करून सोशल मीडियावर टाकणाऱ्या दोघांवर आता शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. बेळगावातील कोंडुसकोप्पजवळ वाघ दिसल्याची अफवेनंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली. व्हायरल व्हिडिओमध्ये वरचा भाग वाघाचा आणि पाय बिबट्याचा आहे असे एडिट करून ते व्हायरल केले. व्हायरल झालेला व्हिडीओ एडिट केला असून आजूबाजूच्या ग्रामस्थांनी काळजी करू नये असे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.