
बेळगाव : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सौ. व श्री. लक्ष्मीबाई जयवंत कोंडुस्कर प्रतिष्ठान यांच्या वतीने शहापूर नार्वेकर गल्ली सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा क्रमांक 45 येथील विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप करण्यात आले. तसेच खासबाग जोशी मळा येथील मराठी शाळा क्रमांक 15 येथील विद्यार्थ्यांना भागातील शिक्षणप्रेमी, समाजसेवक शेखर तळवार यांच्याकडून मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक राजू बिरजे, महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकर्ते सुरज चव्हाण, किरण हुद्दार, शेखर तळवार, उमेश पाटील, अनिल अंबरोळे, प्रवीण पठाडे, महेश कंग्राळकर यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta