बेळगाव : श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नार्वेकर गल्ली, शहापूरच्या बाल गणेश उत्सव मंडळाने अलीकडेच एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे विविध मागण्या केल्या होत्या.
तेंव्हा त्यांनी केलेल्या मागण्यांचे लवकरात लवकर पूर्तता करण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची अंमलबजावणी सुरू झाली असून आज रविवारी गल्ली परिसरातील धोकादायक उच्चदाबाच्या विद्युत तारा हटविण्यात आल्या.
येत्या श्री गणेशोत्सवापूर्वी आमच्या भागातील स्मार्ट स्मार्ट सिटीची रखडलेली विकास कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत. त्याचप्रमाणे श्री आगमन व विसर्जन मार्गावरील खुली गटारे बंदिस्त करण्याबरोबरच रस्त्यावरील खड्डे बुजवून पथदिपांच्या वीज वाहिन्या व्यवस्थित भूमिगत कराव्यात, अशी मागणी नार्वेकर गल्ली, शहापूर बेळगावच्या बाल गणेश उत्सव मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. निवेदनाचा स्वीकार करून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी आपल्या आश्वासनाची पूर्तता करण्यास सुरुवात केली असून आज रविवारी नार्वेकर गल्ली शहापूर परिसरात असलेल्या विजेच्या खांबावरील उच्चदाबाच्या विद्युत तारा हटविण्यात आल्या. हेस्कॉम अधिकारी शिवानंद गलगले यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम झाले. याप्रसंगी बाल गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष सागर नारायण पाटील, कार्याध्यक्ष युवराज विजयकुमार मुरकुंबी यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. पद्धतीने धोकादायक हाय टेन्शन विजेच्या तारा हटविण्यात आल्याने अध्यक्ष सागर पाटील यांनी हेस्कॉम अधिकाऱ्यांचे आभार मानले असून परिसरातील रहिवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.