Tuesday , September 17 2024
Breaking News

सीएससी केंद्रांना राज्य शासनाच्या सुविधा उपलब्ध करू देण्याची मागणी

Spread the love

 

बेळगाव : कर्नाटक शासनाच्या योजना लोकांच्या दारात पोहोचवण्यात सीएससी केंद्रांची भूमिका फार महत्त्वाची आहे. त्यामुळे राज्य सरकारने यापूर्वीच राबविलेल्या लोकप्रिय योजनांच्या अर्जांना सीएससी केंद्रांतून आपलोड करण्याची परवानगी मिळावी. शासनाने केवळ ग्रामीण भागातील ग्रामवन व शहरी भागात कर्नाटक वन यांच्या माध्यमातून गॅरंटी योजना उपलब्ध करून दिले आहे. सेवासिंधू ही सर्विस कॉमन सर्विस सेंटरच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावे, असे निवेदन बेळगावचे खासदार जगदीश शेटर यांना बेळगाव डिस्टिक डिजिटल कॉमन सर्विस असोसिएशन कडून नुकतेच देण्यात आले.

यावेळी सीएससी जिल्हा व्यवस्थापक मल्लिकार्जुन करेरुद्रनवर आणि असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी सुनील जाधव यांनी माजी मुख्यमंत्री जगदीश शेटर महोदयांना सांगितले की, बेळगाव शहरात निवडक ठिकाणी कर्नाटक वन पोर्टल उपलब्ध असल्यामुळे शासनाच्या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी जनसामान्य नागरिकांना लांब रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यात सर्व्हर डाऊनची समस्या निर्माण होत आहे. याचा केंद्र व राज्य शासनाने विचार करावा. तसेच सीएससी केंद्रातून सेवा सिंधू पोर्टल कोणत्याही मध्यस्थाशिवाय सामान्य सेवा केंद्राद्वारे वितरित केले जाऊ शकते आणि ती सरकार आणि लोक यांच्यातील दुवा म्हणून काम करत आहे. लोक कोणत्याही अडचणीशिवाय जवळच्या सीएससी केंद्रावर शासकीय सेवांसाठी सहज अर्ज करू शकतात.

केवळ ग्रामीण भागातील ग्रामवन व शहरी भागात कर्नाटकवन यांच्या माध्यमातून अनेक योजना शासनाने उपलब्ध करून दिलीआहे.पण शहरी भागातील ठराविक ठिकाणी असल्यामुळे शहरी भागातील माणसांनी एक ते दिड किलोमीटर अंतरावर असलेल्या ठिकाणी जाऊन आपली समस्या दूर करून घेतले पाहिजे, याकरिता आम्ही राज्य शासनाकडे मागणी करत आहे.

सेवासिंधू ही सर्विस कॉमन सर्विस सेंटरच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली तर कॉमन सर्विस सेंटरच्या माध्यमातून सेवा सिंधू पोर्टलचा वापर करून, एखादी व्यक्तीला त्यांच्या घरातील सोयीनुसार आवश्यक सेवांसाठी अधिकृत नोंदणी असलेल्या ऑनलाइन सेवा केंद्राच्या दुकानातून अर्ज करू शकतात.तसेच सेवा सिंधू सर्व्हर उपलब्ध झाल्यास सहजपणे जनसामान्य नागरिकांना अर्ज कोठेही करता येईल. जे सर्व विभागांमधील सेवा केंद्राच्या माध्यमातून सेवांसाठी सिंगल विंडो म्हणून कार्य करत आहेत. एखादी व्यक्ती सेवांसाठी ऑनलाइन अर्ज भरत असेल आणि नंतर जवळच्या केंद्राचा शोध घेऊन तेथे तो कागदपत्रे जमा करू शकेल.

एखाद्याला कॉमन सर्विस सेंटरच्या माध्यमातून सिंधू सेवांच्या साठी फॉर्म भरण्याची राज्य शासनाने परवानगी उपलब्ध करून दिली जावी अशी मागणी बेळगाव डिस्टिक मॅनेजर मलिकार्जुन करेरुद्ररान्नवर असोसिएशनचे अध्यक्ष रामचंद्र बदरगडे, सरचिटणीस सुनील जाधव, उपाध्यक्ष समिउल्ला मुल्ला, संचालक मृत्युंजय मंत्रनावर, कामांना चौगुले, संजय मैशाळे, शकील मुल्ला यासह अन्य संघटनेचे पदाधिकारी व सभासद उपस्थितीत होते.

About Belgaum Varta

Check Also

चांगळेश्वरी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित श्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *