Monday , September 21 2026
Breaking News

श्री गणेश विसर्जन व्यवस्थेसाठी प्रशासनाला गणेशोत्सव महामंडळाचे निवेदन

Spread the love

 

बेळगाव : शहर आणि परिसरातील गणेश भक्तांकडून आता उत्सवाची तयारी सुरू झाली आहे. यासाठी प्रशासनाने श्री गणेश विसर्जनाची मिरवणूक योग्यरीतीने साजरी करण्यासाठी व्यवस्था करावी, अशा मागणीचे निवेदन मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी मोहम्मद रेशन यांना देण्यात आले. अनेक कारणांमुळे श्री विसर्जनाची मिरवणूक लांबते. त्यामुळे विसर्जन सोहळा पूर्ण होण्यासाठी विलंब होतो. याची दखल घेऊन विसर्जन मिरवणूक मार्गावरील अडथळे दूर करावे. त्याचप्रमाणे योग्य नियोजन करून समस्या निवारण करण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने करण्यात आली.

निवेदनाचा स्वीकार केल्यानंतर जिल्हाधिकारी म्हणाले की, आपण गणेश विसर्जन मिरवणुकीच्या रस्त्याची लवकरच पाहणी करून मिरवणूक मार्गावरील अनेक समस्यांचे निवारण करून मिरवणूक सुरळीत होईल याकडे लक्ष घालू.

निवेदन देतेवेळी अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण -पाटील, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, कार्यकारी सचिव प्रा. आनंद आपटेकर, उपाध्यक्ष सतीश गौरगोंडा, रमेश कळसन्नावर, राजेंद्र हंडे, बाळू जोशी आणि इतर सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *