
बेळगाव : चलवेनहट्टी येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळच्या वतीने गणेशोत्सवची मुहूर्तमेढ नुकताच करण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश बडवानाचे यांच्या हस्ते मुहूर्तमेढची पुजा करण्यात यावेळी मंडळाचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. एक गाव एक गणपती हा वारसा जपत दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणेश आगमन ते अनंत चतुर्दशी पर्यंत गावातील प्रत्येक गल्लीच्या वतीने आरती केली जाते तसेच समाज प्रबोधनाचे कार्यक्रमासह शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. यावेळी भाविकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात असते यावेळी मंडळचे अध्यक्ष यांनी आपले मनोगत मांडताना दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गणेशोत्सव सगळ्यांनी एकत्र येत मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचे तसेच मंडळाच्या वतीने विधायक व सामाज प्रबोधनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे गणेशोत्सव निमित्त गावात मोठा उत्साह संचारला आहे. यावेळी संजय बडवानाचे लक्ष्मण बडवानाचे, कनोज बडवानाचे, गुंडू पाटील, वैजनाथ पाटील, किरण पाटील, मल्लाप्पा सनदी, अकाश पाटील, भुषण पाटील, मनोज पाटील, अमृत रेडेकर, दिपक बडवानाचे, भारत हुंदरे, नितेश नाथबुवा, राहूल रेडेकर, चंद्रकांत पाटील, अनिल पाटील, परशराम रेडेकर, अजित हुंदरे, ओमकार पाटील, लक्ष्मण निंगोजी बडवानाचे, यश पाटील, जोतेश हुंदरे, श्रेयश पाटील, श्रीतेश बडवानाचे आदी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta