Sunday , July 26 2026
Breaking News

मराठी मॉडेल शाळा येळ्ळूर येथे स्वयंपाक खोलीचे उद्घाटन

Spread the love

 

बेळगाव : सरकारी मराठी आदर्श प्राथमिक शाळा येळ्ळूर येथे विविध देणगीदारांच्या देणगीतून साकार झालेली स्वयंपाक खोलीचे उद्घाटन करण्यात आले.
स्वयंपाक खोली बनविण्यासाठी विविध मान्यवरांनी देणगी दिली होती त्या सर्व मान्यवरांचा सत्कार यावेळी करण्यात आला. श्री. अनंत ना. पाटील, सायली बिल्डिंग आणि लँड डेव्हलपर, वडगाव यांनी खोलीची फरशी, श्री. सचिन कृष्णा घाडी यांनी चौकट, श्री. सुरेश नारायण काकतकर यांनी खोलीचा रंग, श्री. बसवराज सुतार यांनी खोली बाहेरील भिंतीचा रंग, श्री. कीर्तीकुमार श्रीराम माने यांनी इलेक्ट्रिक मटेरियल, श्री. विपुल भाऊराव पाटील यांनी संपूर्ण वायरिंग, श्री. चांगदेव शिवाजी मुरकुटे यांच्याकडून खिडकीचे ग्रील अशा विविध देणगीदारांच्या देणगीतून ही स्वयंपाक खोली साकारण्यात आली. या सर्वांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. खोलीचे उद्घाटन श्री. अनंत ना. पाटील यांच्या हस्ते झाले. तसेच शाळेची विविध क्षेत्रातील प्रगती पाहून यानी शाळेला आणखी 51 हजार रु. ची भरघोस अशी देणगी जाहीर केली. यावेळी येळ्ळूर ग्रा.पं. माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्री. सतीश बाळकृष्ण पाटील आणि येळ्ळूर केंद्राचे केंद्रप्रमुख महेश जळगेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस्.डी.एम्. सी. अध्यक्षा श्रीमती रूपा श्रीधर धामणेकर, प्रमुख पाहुणे म्हणून येळ्ळूर ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य श्री. सतीश बाळकृष्ण पाटील, येळ्ळूर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. महेश जळगेकर, एस्.डी.एम्.सी. उपाध्यक्ष आणि सदस्य आणि सहशिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एस्.बी. पाखरे, प्रास्ताविक वरीष्ठ मुख्याध्यापक श्री. आर. एम्. चलवादी, पाहुण्यांचे स्वागत श्रीमती एम्. एस्. मंडोळकर, पाहुण्यांचा सत्कार श्रीमती ए. वाय. मेणसे, आभार प्रदर्शन श्रीमती एस्. आर. निलजकर यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

अलतगा सरकारी मराठी शाळेत आषाढी एकादशीनिमित्त बालवारकऱ्यांची दिंडी उत्साहात

Spread the love  अलतगा : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त अलतगा येथील सरकारी मराठी उच्च प्राथमिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *