Saturday , March 7 2026
Breaking News

जुनी वंटमुरी येथे विजेच्या धक्क्याने तेरा गुरांचा मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : हुक्केरी तालुक्यातील इस्लामपुर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जुनी वंटमुरी गावात विद्युत खांब पडल्याने 13 गुरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

गावातील तीन लोक एकत्र येऊन गुरे चारायला घेऊन गेले होते. सायंकाळी पाऊस येत असल्याने ते आपली गुरे आपापल्या घरी घेऊन जात होते. करीकट्टी – जुनी वंटमुरी रस्त्याच्या मधोमध असलेला, विजेचा वीद्युत खांब तुटून पडल्याने 13 गुरे जागीच ठार झाली. मुट्टाप्पा बसरगी, यांच्या 4 गायी, 2 बैल, लक्षकिन किलारगी यांच्या मालकीची एक गाय, एक म्हैस आणि यल्लवा मस्ती, यांच्या पाच गायी जागीच ठार झाल्या. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

एमएसएमई नोंदणीकृत व्यापाऱ्यांना दंडातून सवलत देण्याची मागणी

Spread the loveबेळगाव : बेळगाव महानगरपालिकेकडून व्यावसायिक परवान्यासाठी आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या मुद्द्यावर बुधवारी ‘द बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *