
बेळगाव : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन जितो संस्थेच्या वतीने दि. 27 आणि 28 ऑगस्ट रोजी जैन उत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. केएलइ संस्थेच्या डॉ. बी. एस. जिरगे सभागृहात हा कार्यक्रम होणार असून दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन आहे. अशी माहिती जितोचे चेअरमन वीरधवल उपाध्ये, सेक्रेटरी अशोक कटारिया आणि उपक्रमाचे निमंत्रक अमित दोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की जैन उत्सव या उपक्रमाचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. या माध्यमातून सर्व समाजासाठी विविध उपक्रमांचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामधून उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून प्रगती साधण्याची संधी देण्यात येते. जैन समाजाच्या पुढाकारातून सर्व समाजाने एकत्रित यावे. व्यावसायिक वृद्धीसाठी चर्चा करावी अशा पद्धतीची व्यवस्था कार्यक्रमांमध्ये करण्यात आली आहे .या कार्यक्रमात उद्योग व्यवसाय क्षेत्रातील नामवंत व्यक्तींच्या मार्गदर्शनाचा लाभ घेता येणार आहे.दि. 27 रोजी राजेश चंदन शांतीलाल घुले च्या केवल किशन यांचे मार्गदर्शन लाभणार आहे तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. दिनांक 28 रोजी शार्क टॅंक हा कार्यक्रम होणार आहे यामध्ये सौरभ जैन यांचे मार्गदर्शन लाभणार आहे तसेच त्यानंतर जैन गॉट टॅलेंट हा स्पर्धात्मक कार्यक्रम देखील होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पत्रकार परिषदेवेळी पुष्पक हनमनवर, कुंतीनाथ कलमनी, राहुल हजारे, अभय हादीमनी, माया जैन आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta