Monday , September 21 2026
Breaking News

देशस्थ ऋ्ग्वेदी ब्राह्मण मंडळावर अभिनंदनिय निवड

Spread the love

 

बेळगाव : मुंबई येथील अखिल भारतीय देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाच्या कार्यकारणीची निवडणूक नुकतीच संपन्न झाली. बिनविरोध झालेल्या या कार्यकारणीत एकंदर 15 सदस्य निवडण्यात आले असून त्यामध्ये बेळगाव समर्थ अर्बन सोसायटीचे व्हाईस चेअरमन व बेळगाव देशस्थ ब्राह्मण संघाचे कार्याध्यक्ष अभय जोशी आणि देशस्थ ब्राह्मण संघाचे चेअरमन विनायक जोशी या दोघांचा समावेश आहे. बेळगाव, धारवाड व बेंगलोर या कर्नाटकस्थित प्रदेशाचे संचालक म्हणून या दोघांची निवड झाली आहे. नूतन अध्यक्ष महेंद्र गधे यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या दादर येथील मध्यवर्ती कार्यालयात संपन्न झालेल्या या बैठकीत कार्याध्यक्षपदी प्रभाकर कुलकर्णी व कोषाध्यक्षपदी विनोद मांडके यांची निवड झाली आहे.
बेळगावतून झालेल्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *