बेळगाव : जायंट्स सोशल वेल्फेअर असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच कपिलेश्वर रोड येथील जायंट्स भवन येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी मोहन कारेकर होते तर व्यासपीठावर सेक्रेटरी शिवराज पाटील व खजिनदार अशोक हलगेकर उपस्थित होते.
प्रारंभी मोहन कारेकर यांनी स्वागत केले. शिवराज पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अशोक हलगेकर यानी मागील सर्व साधारण सभेचे अहवाल वाचन करून 2023-24 सालचा जमाखर्च सादर करून त्यास मंजुरी घेतली. यावेळी 2024-25 सालासाठी लेखा परीक्षक (C.A.) म्हणून मठपती व कंपनी यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली.
यावेळी 2023-24 सालात आजीव सभासद झालेल्या मधू बेळगावकर, सुनिल चौगुले व मिलिंद खांडेकर यांच्या नावाना मंजुरी देण्यात आली.
यावेळी झालेल्या चर्चेत संजय पाटील, मदन बामणे, विश्वास पवार, मुकुंद महागावकर, उमेश पाटील, यल्लाप्पा पाटील, मधू बेळगावकर, भरत गावडे, राहूल बेलवलकर, गोविंद टक्केकर
यांनी भाग घेतला. शेवटी अशोक हलगेकर यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta