बेळगाव : श्री गणेशोत्सव काळात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून हेस्कॉमकडून दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार असल्यामुळे उद्या रविवार दि. 25 रोजी बेळगाव शहर परिसरात विद्युत पुरवठा दिवसभरासाठी खंडित करण्यात येणार असल्याचे हेस्कॉम विभागाने कळविले आहे.
बेळगाव उत्तर विभागातील इंडाल, वैभव नगर, शिवबसव नगर, शिवाजी नगर, सदाशिव नगर, जिनाबकुळ, सिव्हिल हॉस्पिटल, सुभाष नगर, विश्वेश्वरय्या नगर, केपीटीसीएल कार्यालय, केएलई, युके 27, कुमारस्वामी लेआउट, हनुमान नगर, सह्याद्री नगर, पाटील गल्ली, कॅम्प परिसर, मारुती गल्ली, अंजनेय नगर, महांतेश नगर तसेच दक्षिण भागातील टिळकवाडी, हिंदवाडी, जक्केरी होंडा, एसव्ही कॉलनी, नानावाडी, शहापूर, कपिलेश्वर कॉलनी, शास्त्रीनगर या भागातील विद्युत पुरवठा सकाळी उद्या सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत खंडित राहणार आहे. या खेरीज मंगळवार दि. 27 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत शहराच्या उत्तर भागाचा वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. तरी नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन हेस्कॉमने केले आहे.