बेळगाव : बेळगावात गांजा, पिन्नीसह विविध अमली पदार्थांची विक्री व सेवन सर्रास सुरू असताना बेळगाव पोलिसांनी हेरॉईन, ड्रग्ज विक्रीचे जाळे शोधून काढले आहे.
बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांनी बेळगाव येथे विशेष मोहीम राबवून शहरातील गांजा व इतर अमली पदार्थांच्या विक्रीचा गांभीर्याने विचार करून अनेक दिवसांपासून ड्रग्ज माफियांविरुद्ध लढा देणाऱ्या बेळगाव पोलिसांनी आज हेरॉईन ड्रग्ज विक्री करणाऱ्यांचे जाळे शोधून काढले. बेळगाव येथील टिळकवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी 50 ग्रॅम वजनाच्या हेरॉईनची विक्री करणाऱ्या पाच आरोपींना अटक केली. प्रफुल्ल गजानन पाटील, सुशांत गोविंद कंग्राळकर, नारायण बाबुराव पाटील, सुनिल भैरू असलकर, सलमान बब्बर मोकाशी अशी अटक केलेल्यांची नावे असून ते सर्व जण अनगोळ परिसरातील आहेत.
टिळकवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनायक बडिगेर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सदर कारवाई केली.
Belgaum Varta Belgaum Varta