बेळगाव : सार्वजनिक श्री गणेशोत्सव श्री एकदंत युवक मंडळाच्या वतीने सोमवार दिनांक 26/8/24 रोजी सकाळी मुहूर्तमेढ करण्यात आले. ह्या वर्षी मोठ्या प्रमाणात सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम तसेच गरजूंना आर्थिक मदत करून मंडळ हे आपल्या समाजासाठी कायतरी देणं लागत यासाठीच हे सर्व उपक्रम राबवणार आहोत असे मंडळाचे अध्यक्ष नागेश गावडे यांनी सांगितले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार श्री. अनिल बेनके व उद्योजक श्री. महेंद्र पटेल तसेच डॉक्टर श्री. प्रकाश राजगोळकर यांच्या हस्ते विधिवत मुहुर्तमेढची पुजा करून खांब रोवण्यात आले.
यावेळी माजी आमदार श्री. अनिल बेनके यांनी बोलताना, हे मंडळ वर्षभर सामाजिक, सांस्कृतिक कार्य करत असत. ह्यापुढेही हे मंडळ असेच कार्य करून आपली सामाजिक व सांस्कृतिक वारसा जपेल ही आशा बाळगतो. तसेच डॉक्टर प्रकाश राजगोळकर बोलताना म्हणाले की, या मंडळाने गतवर्षी जो हलता देखावा केला होता याला प्रथम क्रमांक मिळाला बद्धल मंडळाचे कौतुक करून यंदाही असच सामाजिक देखावा दाखवुन पारितोषिक मिळावाव अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रमुख पाहुण्यांचे शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. यावेळी गिरीश कणेरी, आनंद नाईक, पराग देशपांडे, विनायक गावडे, दीपक लंगरकाडे, रजत पाटील, अशोक खवरे, विजय वर्मा, रवींद्र पाटील, अंबज सावंत, उमेश निटूरकर, सहदेव ताशीलदार, शंकर राणे, सुशील कणेरी, महेश बडमंजि तसेच महिला मंडळाचे अध्यक्ष माला कणेरी, मंगल गावडे आधी महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन अरुण गावडे यांनी केले तर आभार संतोष कणेरी यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta