Thursday , April 23 2026
Breaking News

निपाणी तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती पदाधिकाऱ्यांनी घेतली खासदार विशाल पाटील यांची भेट

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : सांगली येथील खासदार विशाल पाटील यांची निपाणी तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती पदाधिकारी यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान सीमा प्रश्नसंदर्भात चर्चा करण्यात आली.
समिती पदाधिकाऱ्यांच्या हस्ते खासदार पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सीमाप्रश्न १९५६ पासून ताटकळत आहे, तो सुटावा म्हणून निवेदन देण्यात आले.सन २००४ पासून प्रलंबित असलेला सर्वोच्च न्यायालयात असणारा खटला तत्काळ सोडविण्यासाठी आपण संसद पटलावर उपस्थित करून प्रलंबित असलेला सीमा प्रश्न सोडविण्यासाठी गती येईल. त्यासाठी संसदेत हा मुद्दा उपस्थित करून सर्वांचे लक्ष वेदण्याचे आवाहन समिती पदाधिकाऱ्यांनी केले.
खासदार विशाल पाटील यांनी, संसदेत आपला बेळगाव, कारवार, निपाणी, बीदर, भालकी ही ८६५ गावे महाराष्ट्रामध्ये समाविष्ट व्हावी, यासाठी असलेला संकल्प आणि संघर्ष वाया जावू देणार नसल्याचे सांगितले. यावेळी निपाणी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष अजित पाटील, उपाध्यक्ष आनंदा रणदिवे, खजिनदार व प्रवक्ते नेताजी पाटील, कार्यकारी सदस्य शिवाजी पाटील, अमोल पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

वाळकी यात्रेत दानोळीच्या बंडा शिंदे यांची बैलगाडी प्रथम

Spread the love  बंडा खिलारे ठरले द्वितीय मानकरी; भर उन्हात शर्यती शौकिनांची गर्दी निपाणी (वार्ता) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *