बेळगाव : चलवेनहट्टी येथील स्मशानभूमीत अंत्यविधीचा चौथरा तसेच शेड व प्रेत जाळण्याचे स्टँड उभारणीच्या कामाचा शुभारंभ ग्रामपंचायत अध्यक्ष अमृत मुद्देनव्वर यांच्या हस्ते करण्यात आला. नुतन स्मशानभूमी कार्यान्वित होऊन दोन वर्षे उलटून गेली होती पण शेड तसेच स्टँड नसल्याने अतंविधिच्या वेळी ग्रामस्थांना अडचणी समाना करावा लागत होता. पावसाळ्यात ही परिस्थिती आणखीन त्रासदायकच ठरत होती यांची जानीव ग्रामस्थांनी ग्रामपंचायत अध्यक्ष तसेच पी डी ओ एन. ऐ. मुजावर यांच्यासह संबंधित ग्रामपंचायत सदस्य यांना करून दिली होती. त्यामुळे यांचा ग्रामपंचायत सदस्य यांनी पाठपुरावा करुन हे कार्य क्रिया योजनेतून मंजूर करुन घेतले असून चार लाख पंचावन्न हजार रुपयाचा निधी मंजुर करण्यात आला आहे. त्यामुळे गावकरी समाधान व्यक्त करत आहेत. तसेच वीज बल्ब, संरक्षक भिंत, पिण्याच्या पाण्यासह विविध सोयीसुविधाची पूर्तता लवकरात लवकर पूर्ण कराव्यात, अशी ग्रामस्थांची मागणी होत आहे. यावेळी पी डी ओ एन. ऐ. मुजावर, कुरेनव्वर, अप्पयगौडा पाटील,/अपया कोलकार, यल्लाप्पा पाटील, निगव्वा पाटील, भरमा सनदी, शट्टूप्पा पाटील, लगमाणा सनदी, ठेकेदार संतोष पाटील, महेश हंप्पनव्वर, भरमा आलगोंडी, मनोहर हुंदरे, बाबु पाटील, इराप्पा पाटील, उमेश पाटील, नारायण नाथबुवा, उमेश कांबळे, संभाजी पाटील आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta