बेळगाव : श्रीगणेश चतुर्थी आणि ईद-मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकाऱ्यांची बैठक आज पार पडली. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना आगामी उत्सव काळात घ्यावयाच्या खबर्दारीसंदर्भात सूचना देण्यात आल्या. दरवर्षीप्रमाणे यंदाही सणासुदीत शांतता व सुव्यवस्था राखणे तसेच जनतेच्या समस्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.
एडीजीपी आर. हितेंद्र यांनी, सण कसे साजरे केले पाहिजेत, उत्सव काळात कोणते नियम पाळले पाहिजेत तसेच कोणत्या तांत्रिक उपाययोजना अंमलात आणल्या पाहिजेत यासह जिल्ह्यातील जनतेने जातीय सलोखा राखून, आनंदात आणि उत्साहात सण पार पाडावेत, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. या बैठकीस पोलिस आयुक्त याडा मार्टिन, आयजीपी विकास कुमार, बेळगावचे एसपी भीमा शंकर गुळेद, डीसीपी रोहन जगदीश, मार्केट, खडेबाजार, एपीएमसी पोलिस स्थानक आणि विविध पोलीस स्थानकातील पीएसआय आणि निरीक्षकांची उपस्थिती होती.
Belgaum Varta Belgaum Varta