Monday , September 21 2026
Breaking News

तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी मनोहर किणेकर यांची निवड

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकारी निवडण्यासंदर्भात आज कार्यकारिणी सदस्यांची महत्वपूर्ण बैठक मराठा मंदिर येथे पार पडली व नवीन पदाधिकारी निवडण्यात आले. बेळगाव तालुका म. ए. समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माजी आमदार मनोहर किणेकर यांच्याकडे सर्वांनुमते सोपविण्यात आली.

नूतन पदाधिकारी खालीलप्रमाणे

अध्यक्ष : मनोहर किणेकर.
कार्याध्यक्ष : आर. एम. चौगुले, संतोष मंडलिक.
सरचिटणीस : एम. जी. पाटील
चिटणीस : मनोहर संताजी, मल्लाप्पा गुरव.
उपाध्यक्ष : लक्ष्मण होनगेकर, रामचंद्र मोदगेकर, मोनाप्पा पाटील, विठ्ठल पाटील.
खजिनदार : मल्लाप्पा पाटील, आर. के. पाटील.
प्रवक्ता : पियुष हावळ, डी. बी. पाटील.

तसेच महिला आघाडीची कार्यकारिणी तयार करण्याची जबाबदारी प्रेमा मोरे, कमल मंडोळकर व वैष्णवी मळीक यांच्याकडे सोपविण्यात आली. त्याचबरोबर राजू किणेकर, महेंद्र जाधव, मयूर बसरीकट्टी, अंकुश पाटील, किसन लाळगे, रोहित गोमानाचे, मनोहर हुंदरे, चेतन पाटील, किरण पाटील यांच्याकडे युवा आघाडी नवीन कार्यकारिणी तयार करण्याची जबाबदारी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

तालुका समितीच्या पुढील बैठकीमध्ये मध्यवर्ती समितीवर पाठवण्यात येणाऱ्या सदस्यांची व इतर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार येईल, असे बैठकीत ठरले..

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *