व्हा. चेअरमनपदी शाम सुतार यांची फेर निवड
बेळगाव (वार्ता) : कॅपिटल वन या संस्थेच्या संचालक मंडळाची पुढील पाच वर्षासाठी बिनविरोध निवड झाली असून रिटर्निंग अधिकारी आर. एन. नुली यांच्या अध्यक्षतेखाली दि. 17 जानेवारी 2022 रोजी संस्थेच्या चेअरमन आणि व्हा. चेअरमन पदाची निवड करण्यात आली. यावेळी संस्थेच्या चेअरमनपदी शिवाजीराव हंडे, व्हा. चेअरमन पदी शाम सुतार यांची निवड करण्यात आली.
यावेळी संस्थचे संचालक शरद पाटील यांनी संस्थेचे नूतन चेअरमन आणि व्हा. चेअरमन यांचा सर्व संचालक मंडळाच्यावतीने हार आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि त्यांचा पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संस्थेचे चेअरमन शिवाजीराव हंडे यांनी सर्वच संचालक मंडळाचे आभार मानत संस्थेच्या पुढील यशस्वी वाटचालीबद्दल आपण सदैव कटिबद्ध राहू अशी ग्वाही दिली. सदर बैठकीस संस्थेचे सर्वच नूतन संचालक रामकुमार जोशी, शिवाजीराव अतिवाडकर, सदानंद पाटील, संजय चौगुले, शरद पाटील, भाग्यश्री जाधव, नंदा कांबळे तसेच संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta