बेळगाव (वार्ता) : तरुण युवासह प्रत्येक माणसाने आपल्या आयुष्यात रक्तदान करण्यासाठी पुढे यावे. त्याने आरोग्य सुधारते. रक्तदान हे महा दान आहे जे प्रत्येकाने एकदा तरी रक्त दान करावे असे बेळगाव तालुका आरोग्यधकारी डॉ. शिवानंद मस्तीहोळी म्हणाले.
बेळगाव येथील महावीर भवन येथे जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या जितो बेळगाव विभागातर्फे व ओषधी नियंत्रण विभाग, बेळगाव, विवा फार्मा, अथर्व फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात ते बोलत होते.
जिवंत असताना रक्तदान, नेत्रदान, त्वचा दान किंवा अवयवदान यातून एकमेकांना अप्रत्यक्षपणे मदत होऊ शकते. हे दान सर्व दानांपेक्षा मोठे आहे. प्रत्येकाने आपल्या जीवनात या दानधर्माचा अवलंब करावा, असे ते म्हणाले.
औषधी नियंत्रण विभागाचे सहाय्यक नियंत्रक रघुराम एन, कर्नाटक ब्लड बँक असोसिएशनचे चेरामन गिरीश, जितो केकेजी झोनचे सचिव विक्रम जैन, जितो बेळगाव विभागाचे उपाध्यक्ष मुकेश पोरवाल, डॉ. महांतेश रामण्णवर, जितो बेळगांव सचिव अमित दोषी आदींची भाषणे झाली. विवा फार्मा चे संचालक हर्षवर्धन इंचल यांनी कार्यक्रम यशस्वी करिता विशेष परिश्रम घेतले.
केएलई हॉस्पिटल, ब्लड बँक, भगवान महावीर ब्लड बँक, बीमसा ब्लड बँक आणि बेळगाव ब्लड बँक या चार संस्थांना जनतेने रक्तदान केले. या विशाल रक्तदान शिबिरात विक्रमी 432 जणांनी रक्तदान केले. प्रवीण खेमलापुरे यांनी पाहुण्यांचे स्वागत करून कार्यक्रम सादर केला.
