संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर ग्रामदैवत श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानि्ंसह भारती महास्वामीजींच्या आज्ञानुसार आणि शासनाच्या नियमानुसार धार्मिक भरगच्च कार्यक्रमांनी संकेश्वर श्री शंकरलिंग रथोत्सव यात्रा होणार आहे. यावर्षी अष्टमी तिथीची वृध्दी असल्यामुळे रथाचा मुक्काम सलग तीन दिवस नारायण बनशंकरी मंदिराजवळ राहणार आहे. रथोत्सवाचे कार्यक्रम असे 6 फेब्रुवारी 2022 रोजी कोठी पूजनाने रथोत्सव यात्रेची सुरुवात होईल. 7-2-2022 रोजी रथपूजा,8-2-2022 रोजी रथ शंकरलिंग मंडळाकडून दोरखडीने लाकडी थरप लावून सवाद्य समवेत ओढत नारायण मंदिरकडे आणला जाईल. 8, 9 आणि 10 असे तीन दिवस रथाचा मुक्काम नारायण बनशंकरी मंदिराजवळ राहणार आहे. शुक्रवार दि. 11 फेब्रुवारी 2022 रोजी यात्रेचा मुख्य दिवस भरयात्रा (महायात्रा) होईल. यादिवशी रथ सवाद्य मिरवणुकीने नारायण बनशंकरी मंदिराकडून श्री शंकरलिंग मठाकडे स्वस्थानी आणला जाणार आहे. 16 फेब्रुवारी 2022 रोजी रथाचा कळस उतरवून यात्रोत्सवाची सांगता केली जाणार आहे. कोरोनाच्या नियमानुसार रथोत्सव यात्रा साजरा करणेचा सर्वोतोपरी अधिकार श्री शंकराचार्य महाराजांचा राहणार आहे.
