संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर रोलर स्केटिंग अकॅडमीच्यावतीने देशाचा 73 प्रजासत्ताक दिन तासभर नॉनस्टाफ स्केटिंग उपक्रमाने उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. यामध्ये अकॅडमीच्या 40 स्केटिंगपटूंनी आपला सहभाग दर्शविला. येथील राणी चन्नम्मा मार्केट यार्डमध्ये तासभर नॉनस्टाफ स्केटिंग उपक्रमाला संकेश्वर पोलिस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी, एपीएमसी संचालक नंदू मुडशी यांनी चालना दिली. स्केटिंगपटूंनी भारत माता की जय, वंदे मातरमच्या जयघोषणांनी सारा परिसर दुमदुमून सोडलेला दिसला.
यावेळी डॉ. रमेश दोडभंगी, कल्याणकुमार निलाज, सचिन सपाटे, संकेश्वर रोलर स्केटिंग अकॅडमीचे प्रशिक्षक अजितसिंग शिलेदार, प्रमिला शिल्लेदार, स्केटिंगपटू उपस्थित होते. उपक्रमात सहभागी विवेक दोडभंगी, स्वराज सपाटे, प्रितम निलाज, राही निलाजसह सर्वच स्केटिंगपटूंना मेडल व आकर्षक प्रमाणपत्र देण्यात आले.
Check Also
वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप
Spread the love दड्डी : सलामवाडी ता. हुक्केरी येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित घटप्रभा …