Saturday , March 7 2026
Breaking News

कंगना राणौत यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा भाजप महिला मोर्चाकडून निषेध

Spread the love

 

बेळगाव : शिरोमणी अकाली दल (अमृतसर)चे प्रमुख सिमरनजीत सिंग मान यांनी भाजप खासदार व अभिनेत्री कंगना राणौत यांच्याविरोधात केलेल्या निंदनीय वक्तव्याचा भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव डाॅ. सोनाली सरनोबत यांनी आज तीव्र निषेध केला आहे.

भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना “सिमरनजीत सिंग मान यांच्या टिप्पण्या अस्वीकार्य आहेत आणि ज्या सभ्य राजकीय रणनीतीच्या मर्यादेच्या पलीकडे जातात. बलात्कारासारख्या संवेदनशील मुद्द्यावर प्रकाश टाकणे आणि बदला घेण्यासाठी त्यांचा वापर करणे केवळ लाजिरवाणेच नाही तर अत्यंत अस्वस्थ करणारे आहे,” असे म्हंटले आहे. त्याचप्रमाणे “स्वतः केलेल्या वक्तव्याबद्दल मान यांनी माफी मागितली पाहिजे. तसेच ते भविष्यात अशा प्रकारची असंवेदनशील टिप्पणी करणे टाळतील अशी अपेक्षा करते असे सांगून “एक महिला आणि एक नेता या नात्याने मी कंगना राणौतच्या पाठीशी उभी आहे आणि आमच्या भाजपा सहकाऱ्यांबद्दल अशी अपमानास्पद भाषा खपवून घेणार नाही,” असेही डॉ. सोनाली सरनोबत यांनी स्पष्ट केले.

About Belgaum Varta

Check Also

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला ३० वर्षांची सक्तमजुरी

Spread the love  बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा पोक्सो न्यायालयाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *