बेळगाव : बेलगाम रोलर स्केटिंग अकादमी आयोजित रोलर स्केटिंग चॅम्पियनशीप 2022 स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून खासबाग श्रींगारी कॉलनी येथील ड्रीमज स्केटिंग रिंकवर झालेल्या या स्पर्धेत सुमारे 160 स्केटिंगपटूंनी भाग घेतला होता. प्रमुख अतिथी संतोष श्रींगारी, तुकाराम शिंदे, सिद्धू संबर्गी, शंकर कांबळे, सतीश कुमार, प्रकाश शहापूरकर, श्री. सुनील, स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर यांच्या उपस्थितीत स्पर्धेला चालना देण्यात आली. स्पीड स्केटिंग प्रकारात 500 ते 1000 मीटर रिंग रेसमध्ये पाच वर्षांखालील मुलांच्या गटात श्लोक धोंगडी याने दोन सुवर्णपदके, पाच वर्षांखालील मुलींच्या गटात सायली जांगळे हिने दोन सुवर्णपदक पटकाविले. पाच ते सात वर्षे वयोगटात मुलांच्या विभागात विधीत कल्याणकुमार यांने दोन सुवर्ण, अन्वित शिंगडी याने दोन रौप्य तर शिवाय पाटीलने दोन कांस्यपदके तर मुलींच्या विभागात अल्पिता गवस हिने दोन सुवर्ण, अनन्या पाटील हिने एक रौप्य एक कास्य तर रायांशी महागावकर हिने एक कांस्य व एक रौप्यपदक पटकाविले. सात ते नऊ वयोगटातील मुलांच्या विभागात आर्या कदम याने दोन सुवर्ण, स्वयम् पाऊसकर याने एक रौप्य, एक कांस्य, ओमसाई लाड याने एक कांस्य तर सद्गुण माधेद याने एक रौप्यपदक तर मुलींच्या विभागात ध्रुवा पाटील हिने दोन सुवर्ण, सानवी मेदार हिने दोन रौप्य तर ईश्वरी पवार हिने दोन कांस्यपदके मिळविली. नऊ ते अकरा वयोगटात मुलांच्या विभागात अवनीश कामनवर याने दोन सुवर्ण, कुलदीप बिर्जे याने दोन रौप्य तर कृष्णा गवस याने 2 कांस्यपदके तर मुलींच्या विभागात खुशी अगसीमनी याने दोन सुवर्ण, पूर्वी चौधरी हिने दोन रौप्य तर वैभवी राजमाने दोन कांस्यपदके मिळविली. 11 ते 14 वयोगटातील मुलांचा विभागात सौरभ साळुंखे याने दोन सुवर्ण, सोहन हिरेमठ यांने दोन रौप्य तर सोहम कंग्राळकर यांने दोन कांस्यपदके मिळविली. मुलींच्या विभागात अनघा जोशी हिने दोन सुवर्ण, जानवी तेंडुलकर हिने दोन रौप्य तर सानवी इटगीकरने दोन कांस्य पदके मिळवली. 14 ते 17 वयोगटात मुलांच्या विभागात साईसमर्थ अजाना यांने दोन सुवर्ण तर मुलींच्या विभागात विशाखा फुलवाले हिने दोन सुवर्ण व वैभवी कांबळे हिने दोन रौप्यपदके पटकाविली.
Check Also
आनंदनगर नाल्यासंदर्भात लोकप्रतिनिधींकडून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न
Spread the love बेळगाव : आनंदनगर – वडगाव येथील नाल्याचे बांधकाम खासगी जागेतून का करण्यात …