बेळगाव : कर्नाटक सरकार, जिल्हा पंचायत, युवा सबलीकरण आणि क्रीडा विभाग, बेळगाव, निसर्ग साहस संस्था व छावा स्काऊट-गाईड विभाग तसेच सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा, कडोली यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद जयंती आणि राष्ट्रीय युवा सप्ताहचे औचित्य साधून स्काऊट व गाईडच्या विद्यार्थ्यांसाठी रांगोळी, चित्रकला, भाषण व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
स्काऊट विभागासाठी घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत ओम अशोक मायाणा, शशिकांत बोकडे व सत्यम बाळकृष्ण भोगणे यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक पटकाविला. रांगोळी स्पर्धेत सार्थक बाळकृष्ण अतिवाडकर, शशिकांत बोकडे व रोहन कल्लाप्पा पाटील तर भाषण स्पर्धेत केतन संतोष देसाई, सार्थक बाळकृष्ण अतिवाडकर व आर्यन अनिल डंगरले यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकाविला. निबंध स्पर्धेत आर्यन अनिल डंगरले, अभय कल्लाप्पा कडेमणी व केतन संतोष देसाई यांनी अनुक्रमे पहिला दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकाविला.
गाईड विभागासाठी घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत नम्रता विक्रम पाटील, संध्या प्रकाश धायगोंडे व राजनंदिनी राजू चौगुले यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक पटकाविला. रांगोळी स्पर्धेत संचिता मारुती कुट्रे, नम्रता विक्रम पाटील व सृष्टी युवराज मायाणा यांना यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला. भाषण स्पर्धेत संचिता मारुती कुट्रे, श्रेया शेखर रूटकुटे व वैष्णवी अनंत पवार तर निबंध स्पर्धेत संचिता मारुती कुट्रे, सृष्टी युवराज मायाणा व नम्रता विक्रम पाटील यांनी अनुक्रमे पहिला दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला.
युवा सबलीकरण बेळगावचे तालुका अनुष्ठान अधिकारी एम. पी. मरनुर, तालुका स्काऊट अँड गाईडच्या कार्यदर्शी श्रीमती एस. एल. बंदकनवर, एसडीएमसी अध्यक्ष प्रफुल्ल पाटील, चंद्रकांत पाटील, राजू चौगुले, मुख्याध्यापक सी. एम. जाधव, सह शिक्षक एम. आर. पाटील, स्काऊट मास्टर रमेश अलगुडेकर, सहशिक्षिका श्रीमती ए. एम. सरदेसाई, एस. एस. शिंदे, श्रीमती व्ही. एन. माळी, श्रीमती जे. के. कोळेकर, श्रीमती आर. जी. हट्टी, श्रीमती एस. एल. पाटील, श्रीमती जी. वाय. तहशीलदार, श्रीमती एस. डी. तनपुरे, श्रीमती शीतल कोलते व्यासपीठावर उपस्थित होते.
श्रीमती जे. के. कोळेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. आर. बी. अलगुडेकर यांनी स्वागत केले तर एम. आर. पाटील यांनी आभार मानले.