संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर गांधी चौकात शासकीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमात घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेचे पूजन करणे राहून गेल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जनजागृती वेदिकेचे जिल्हा अध्यक्ष दिलीप होसमनी आणि चिकोडी जिल्हा काँग्रेस कामगार विभागाचे अध्यक्ष महेश हट्टीहोळी यांनी आक्षेप घेतला होता. त्यांनी बेळगांव जिल्हाधिकारी सहाय्यक जिल्हाधिकारी, तहसीलदार डॉ. डी. एच. हुगार यांच्याकडे गांधी चौक येथील प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात शासकीय आदेशाचे उल्लंघन करण्यात आल्याचे निर्दशनास आणून दिले होते. त्याची दखल घेत गांधी चौक येथे ताबडतोब घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेचे पूजन करुन चूक भूल सुधारण्याचे काम प्रकाश खंडागळे यांनी केले. पोलिस अधिकारी तसेच शंकर बागलकोटी अनिल जाधव कुमार मिर्जी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. संकेश्वर पोलीसांनी ताबडतोब प्रकाश खंडागळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेचे पूजन करुन शासकीय आदेशाचे पालन करायला भाग पाडले बद्दल दिलीप होसमनी यांनी समाधान व्यक्त केले आहे.
