
बेळगाव : सार्वजनिक वाचनालय, बेळगाव या संस्थेच्या वतीने दि. २८ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत आयोजित केलेल्या संगीत भजन स्पर्धेत पुरुष गटात प्रथम क्रमांक श्री संत तुकाराम भजनी मंडळ, माणगाव (चंदगड) आणि महिला गटात मुक्त ग्रुप महिला भजनी मंडळ, टिळकवाडी (बेळगाव) यांना देण्यात आला. या स्पर्धेत एकूण २६ भजनी मंडळांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. प्रत्येक संघाने उत्कृष्टरित्या सादरीकरण केले. दोन्ही गटामध्ये प्रत्येकी दहा बक्षिसे देण्यात आली. याशिवाय उत्कृष्ट वादक व गायक यांना प्रत्येकी बक्षिसे देण्यात आली.
शनिवार दि. ३१ ऑगस्ट रोजी मराठा मंदिरात या स्पर्धेची सांगता झाली. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यावेळी सांगता समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजीराव हंगिरकर, संचालक मराठा मंदिर, बेळगाव आणि . विजय मुचंडीकर, उद्योजक, बेळगाव, वाचनालयाचे अध्यक्ष गोविंदराव राऊत, उपाध्यक्ष डॉ. विनोद गायकवाड, कार्यवाह सौ. लता पाटील, सहकार्यवाह रघुनाथ बांडगी, नेताजी जाधव, अनंत लाड, सौ. सुनीता मोहिते, प्रसन्न हेरेकर हे यावेळी उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे पुरुष गटात अनुक्रमे रवळनाथ भजनी मंडळ, अडकूर (चंदगड), श्री हरी संगीत कलामंच कल्लेहोळ (बेळगाव), रवळनाथ भजनी मंडळ गोल्याळी (खानापूर), रामकृष्ण हरी भजनी मंडळ जांबोटी (खानापूर), श्री विठ्ठल रखुमाई भजनी मंडळी कुद्रेमानी (बेळगाव), श्रीदेव चव्हाटा भजनी मंडळ, केंचेवाडी (चंदगड), जय हनुमान कलाप्रेमी भजनी मंडळ करंजगाव (चंदगड), श्री नागेशदेव बाल भजनी मंडळ, नागुर्डेवाडा (खानापूर), उत्तेजनार्थ श्री धन्य ते माता पिता बाल भजनी मंडळ, बाकनूर (बेळगाव) तसेच महिला गटात अनुक्रमे श्री सद्गुरु महिला भजनी मंडळ, अनगोळ, दैवज्ञ महिला भजनी मंडळ, शहापूर, श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ किणये (बेळगाव), ओंकार महिला भजनी मंडळ हनुमाननगर, संत मुक्ताई महिला भजनी मंडळ, वडगाव, श्री विठ्ठल रखुमाई महिला भजनी मंडळ कंग्राळी (खुर्द), जय सातेरी महिला भजनी मंडळ, करंजगाव (चंदगड), श्री गजानन महिला भजनी मंडळ, कुद्रेमानी, उत्तेजनार्थ श्री माता भक्ती महिला भजनी मंडळ, शहापूर व जय हनुमान ज्ञान माऊली महिला भजनी मंडळ, करंजगाव (चंदगड) या मंडळांना बक्षिस देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट तबलावादक किशोर बामूचे (अडकूर), वैभव पाटील (कल्लेहोळ), उत्कृष्ट पेटीवादक- सृष्टी शंकर पाटील, (कल्लेहोळ), उत्कृष्ट गायक विठ्ठल गुरव (गोल्याळी) यांना गौरविण्यात आले. परीक्षक म्हणून विजय बांदिवडेकर व सहदेव कांबळे यांनी काम पाहिले.

Belgaum Varta Belgaum Varta