Monday , September 21 2026
Breaking News

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आवाहन

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे एक ज्येष्ठ मार्गदर्शक आणि नेते कैलासवासी अर्जुनराव गोविंदराव घोरपडे यांची जन्मशताब्दी आज 2 सप्टेंबर 2024 रोजी मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे साजरी करण्यात येणार आहे. याप्रसंगी महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते पद्मविभूषण श्री. शरदचंद्रजी पवार, महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री. जयंतराव पाटील, महाराष्ट्र राज्याच्या सहकार खात्याचे निवृत्त पणन संचालक तथा आयुक्त श्री. दिनेश ओऊळकर हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्ष श्री. दीपक दळवी व पदाधिकारी यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *