बेळगाव : गणेशोत्सवानिमित्त येथील स्वामी समर्थ आराधना केंद्र आणि श्री आधार मल्टीपर्पज सौहार्द सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने पहिली ते चौथी पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी अथर्व शिर्ष पठण स्पर्धा ठेवण्यात आल्या आहेत. मंगळवार दि. 10 सप्टेंबर रोजी या स्पर्धा स्वामी समर्थ आराधना केंद्र, महाद्वार रोड बेळगाव येथे घेतल्या जातील. या स्पर्धेतील विजेत्यांना रोख रकमेचे पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. भाग घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुनील चौगुले यांना 944 81 49853 या क्रमांकावर संपर्क साधून आपली नावे नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta