Friday , November 6 2026
Breaking News

गुरु विशिष्ट पुरस्काराने प्राचार्य डॉ. वेणुगोपाल जालीहाळ सन्मानित

Spread the love

 

बेळगाव : शिक्षक दिनाचे औचित्य साधून गोगटे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वेणुगोपाल जालीहाळ यांना कर्नाटकातील दयानंद सागर बिजनेस स्कूल या प्रतिष्ठित संस्थेने 2024 सालचा ‘गुरु विशिष्ट पुरस्कार’ देऊन सन्मानित केले आहे.

प्राचार्य डॉ. वेणूगोपाल जालीहाळ हे गत 22 वर्षापासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी शहरातील गोगटे वाणिज्य महाविद्यालयाच्या बीसीए विभागाचे समन्वयक म्हणून गेली 18 वर्षे उत्तम कार्य केलेले आहे. गत फेब्रुवारी 2024 पासून गोगटे वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी रुजू झालेल्या डॉ. जालीहाळ यांचा उत्कृष्ट शिक्षक आणि समर्थ प्रशासक असा त्यांचा लौकिक आहे.

नव्या शैक्षणिक प्रणालीचा प्रचार व प्रसार करण्यात त्यांचा हातखंडा आहे. कर्नाटकातील सर्व विश्व विद्यालयांमध्ये त्यांनी एनइपी वर कार्यशाळा घेतलेली आहे. त्याचबरोबर राणी चन्नम्मा विश्व विद्यालयाच्या शैक्षणिक अध्ययन बोर्डाचे ते सदस्य आहेत. सदर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे कार्य त्यांनी कित्येक वर्षे समर्थपणे केले आहे.

डॉ. वेणुगोपाल जालीहाळ यांना अलीकडेच राणी चन्नम्मा विद्यापीठाने पीएचडी पदवीने सन्मानित केलेले आहे. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही अनेक शोध निबंध लिहिलेले आहेत.

त्यांच्या या सर्व कार्याचा गौरव म्हणून कर्नाटकातील दयानंद सागर बिजनेस स्कूल या प्रतिष्ठित संस्थेने त्यांना 2024 सालचा गुरु विशिष्ट पुरस्कार देऊन आज सन्मानित केले. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व थरातून अभिनंदन होत असून विद्यार्थी प्रिय शिक्षक असलेले डॉ. वेणूगोपाल जालीहाळ हे सामाजिक कार्यात सुद्धा अग्रेसर असतात.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *