बेळगाव : बेळगाव जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (सीमाभाग) यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षीही सुंदर सार्वजनिक श्री गणेश मुर्ती स्पर्धा 2024 आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या स्पर्धा बेळगांव शहर मर्यादित उत्तर आणि दक्षिण विभागामध्ये होणार आहेत. श्री गणेश मुर्ती व मंडप परिसर स्वच्छता दोन्हींचे निरीक्षण होणार आहे. उत्तर विभागासाठी 5 बक्षिसे व दक्षिण विभागासाठी 5 बक्षिसे वितरीत करण्यात येतील. श्री गणेश मुर्ती निरीक्षण गणेश प्रतिष्ठापनेपासून ते दि. 15 सप्टेंबर 2024 पर्यंत करणार शिवसेना पदाधिकारी करणार आहेत. दि. 15 सप्टेंबर 2024 रोजी बक्षिस वितरण होणार आहे. ज्या मंडळाचा श्रीमुर्तीचा प्रथम क्रमांक येईल त्याच श्री मंडप ठिकाणी बक्षिस वितरण कार्यक्रम होईल.
श्रीमुर्ती विजेत्या मंडळाना फोनद्वारे कळविण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
Belgaum Varta Belgaum Varta