बेळगाव : येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन)च्या वतीने यंदा राधाष्टमी बुधवार दि. 11 सप्टेंबर 2024 रोजी राधा गोकुळ आनंद मंदिरात साजरी होत आहे. त्यानिमित्त सायंकाळी साडेसहा ते सात वाजेपर्यंत अभिषेक, सात ते साढे आठ वाजेपर्यंत प. पू. भक्ति रसामृत स्वामी महाराज यांचे कथाकथन, महाआरती आणि रात्री साडेआठ नंतर कीर्तन व महाप्रसाद होईल. दरम्यान दिवसभर मंदिरात भजन आदी कार्यक्रम होतील. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कृष्ण भक्तीचा लाभ घ्यावा, असे आवाहन इस्कॉनतर्फे करण्यात आले आहे.