Saturday , March 7 2026
Breaking News

गृहनिर्माण प्रकल्प अंतर्गत रुक्मिणीनगर गृहनिर्माणच्या कामाचा शुभारंभ

Spread the love

बेळगाव: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गृहनिर्माण प्रकल्प अंतर्गत रुक्मिणीनगर येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना घरे बांधून देण्यात येणार आहेत या कामाचा शुभारंभ आज आमदार अनिल बेनके आणि खासदार मंगला अंगडी यांच्या हस्ते करण्यात आला.

झोपडपट्टीत राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबियांना घरे बांधून देण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे. त्यामुळे आमदार अनिल बेनके आणि खासदार मंगला अंगडी यांच्या नेतृत्वाखाली हे काम हाती घेण्यात आले आहे.

बेळगाव उत्तर मतदार क्षेत्रात गृहनिर्माण विभाग आणि कर्नाटक झोपडपट्टी विकास मंडळ यांच्या वतीने रुक्मिणी नगर येथे 905 घरांचे बांधकाम पंतप्रधान गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत या घराच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे.
या कामाच्या शुभारंभानंतर आमदार अनिल बेनके यांनी 2023 आणि 2024 पर्यंत प्रत्येकाला घरे मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले.
तसेच या प्रकल्पासंबंधी काहीही त्रुटी असल्यास कंत्राटदाराने अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर हे काम पूर्णत्वास न्यावे अशा सूचना दिल्या. याप्रसंगी नगरसेवक अधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला ३० वर्षांची सक्तमजुरी

Spread the love  बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा पोक्सो न्यायालयाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *