बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात आलेल्या पूर्व आफ्रिकन देश रवांडाच्या उच्चायुक्त श्रीमती जॅकलिन मुकांगिरा यांनी सुवर्ण विधानसौधला भेट दिली. यावेळी जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी जॅकलिन यांचे स्वागत केले. मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सुवर्ण विधानसौध येथे होणाऱ्या विधानसभा व विधानपरिषदेचे कामकाज तसेच विधान परिषदेच्या हिवाळी अधिवेशनाची माहिती दिली.
सार्वजनिक बांधकाम विभाग उत्तर विभागाचे मुख्य अभियंता एच.सुरेश, अपर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. सोबरद, सहायक कार्यकारी अभियंता प्रवीण हुलजी आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta