Tuesday , March 3 2026
Breaking News

मद्यपीकडून बार मॅनेजरवर हल्ला; काकती येथील घटना

Spread the love

 

बेळगाव : गणेशोत्सवानिमित्त काल शनिवारी दारूविक्रीवर बंदी असल्याने आज रविवारी पहाटेच काकती येथील एका बार आणि रेस्टॉरंटमध्ये बसून दारू प्राशन करणाऱ्या एका मद्यपी व्यक्तीने बार मॅनेजरवर जबर हल्ला केला. यामध्ये बार मॅनेजर गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मद्यधुंद अवस्थेत असलेल्या आरोपी सुनील करिकट्टी याने बार मॅनेजरवर बाटलीने हल्ला केला. काकती पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली असून काकती पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *