Monday , December 15 2025
Breaking News

मराठी विद्यानिकेतन शाळेला खो-खो स्पर्धेत दुहेरी मुकुट

Spread the love

 

बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले.
मराठी विद्यानिकेतन मैदानावर झालेल्या तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत प्राथमिक विभाग मुलांच्या खो-खो संघाने उपांत्य सामन्यात महांतेश नगर शाळेचा एकतर्फी पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश मिळविला. अंतिम सामन्यात 14 नंबर शाळेचा सलग दुसऱ्यांदा पराभव करत तालुकास्तरीय विजेतेपद मिळविले.
तसेच माध्यमिक विभाग मुलींच्या खो-खो संघाने उपांत्य सामन्यात एकतर्फी विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश मिळाला. अंतिम सामन्यात गोमटेश शाळेचा पराभव करून सलग दुसऱ्यांदा तालुकास्तरीय विजेतेपद मिळविले.
या दोन्ही संघांची जिल्हास्तरीय होणाऱ्या खो – खो स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
या खेळाडूंना प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक गजानन सावंत, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्रशिक्षक श्रीधर बेंनाळकर व क्रीडा शिक्षक महेश हागीदळे, दत्ता पाटील व पूजा संताजी यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

About Belgaum Varta

Check Also

पतीकडून पत्नी आणि कुटुंबियांचा पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न

Spread the love  अथणी : पतीच्या घरी झालेल्या भांडणामुळे कंटाळून आपल्या गावी गेलेल्या पत्नी आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *