मूलभूत हक्कांचे संरक्षण म्हणजेच लोकशाही : मंत्री सतीश जारकीहोळी
बेळगाव : विविधतेत एकसंध असलेल्या आपल्या देशाच्या वैविध्यपूर्ण भावना अभिव्यक्त करणे आणि त्यांचे संरक्षण करणे, त्याच्या मूल्यांना प्रोत्साहन देणे हाच आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाचा मुळ उद्देश असल्याचे प्रतिपादन बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी बोलताना केले
सुवर्ण विधानसभा येथे आज रविवारी सकाळी लोकशाही दिन साजरा करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनानिमित्त रामदुर्ग तालुक्यातील सलहल्ली ते कित्तूर तालुक्यातील तेगुर या गावापर्यंत 145 किमी लांबीची मानवी साखळी उभारण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला. जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्याचे आवाहन केले.
महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, मानवतेच्या मूल्यांचा संदेश देणारा हा विश्वविक्रमी कार्यक्रम अभूतपूर्व आहे. प्रत्येकाने संविधानातील मानवी मूल्ये आपल्या जीवनात अंगीकारण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाला मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार विठ्ठल हलगेकर, आमदार आसिफ (राजू) सेठ, बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, पोलीस आयुक्त याडा मार्टिन, जिल्हा पोलिस वरिष्ठ अधिकारी भीमाशंकर गुळेद, प्रादेशिक आयुक्त राहुल शिंदे, प्रशिक्षणार्थी ए.ए.एस. अधिकारी दिनेशकुमार मीना, महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंडी, डीसीपी रोहन जगदीश, जिल्ह्यातील विविध संघटनांचे अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी, जनता, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.